लांडगा आला रे
मेंढपाळ मुलगा
नमस्कार मित्रांनो Iconik person वर आपले स्वागत आहे.तुमच्यासाठी नवनवीन माहीतीचा खजिना घेऊन आलो आहे. चला तर आज आपण लहान मुलांसाठी एक गोष्ट पाहणार आहोत.चला तर मग सुरु करुया
गावात एक लहान मेंढपाळ मुलगा राहत होता. तरुण मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना दररोज जवळच्या टेकडीवर चरायला घेऊन जात असे. एक दिवस मुलाला कंटाळा आला. म्हणून मेंढ्या चारायला जात असताना त्याने त्याच्या गावातील लोकांवर एक विनोद करण्याचा निर्णय घेतला. तो शक्य तितक्या जोरात ओरडला, "लांडगा... लांडगा!"
लोकांनी त्याचा आवाज ऐकून धाव घेतली. आणि ते जवळ आल्यावर तो जोरजोरात हसायला लागला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच गावातील लोक संतापले. त्या लोकांनी त्याला ईशारा दिला कि अशी गंमत परत करू नको. काही दिवसांनंतर मुलाने पुन्हा एकदा खोडसाळपणा केला. लोकांनी पुन्हा एकदा मुलाला सावध केले. मग असेच एक दिवस खरच लांडगा आला. तो ओरडु लागला लांडगा आला लांडगा पण यावेळेस त्याच्या मदतीला कुणीही आले नाही व लांडग्याने सगळ्या मेंढ्या खाऊन टाकल्या. तर मुलांनो तुम्हाला समजलेच असेल या गोष्टीचे तात्पर्यः
तात्पर्यः आपण काही गोष्टी गंमत म्हणून करतो पण एक वेळ अशी येते की लोकं आपल्यावर विश्वास ठेवत नाही.
चला तर मित्रांनो गोष्ट आवडली असेल तर पेजला फाॅलो करुन घ्या व शेअर करायला विसरू नका.अशीच नवनवीन माहिती पाहीजे असेल तर comment करून सांगा कुठल्या विषयावर blog बनवायला पाहिजे.
धन्यवाद।
Post a Comment